कोणीच नसतं आपल्याला दुःखातून बाहेर काढणारं ,
कठीण प्रसंगाच्या काळात मदतीचा हात पुढे करणारं ...
आपली जवळची माणसंच परक्यासारखी वागू लागतात ,
आपल्याकडेच सच्चेपणाचे पुरावे मागू लागतात ...
शेवटी नशीबाचे भोग आपल्यालाच भोगावे लागतात ,
पदोपदी असंख्य यातना, अपमान झेलावे लागतात ...
तरीही लोकांसमोर मात्र हे दुःख दाखवायचं नसतं ,
हसत हसत आपल्या अश्रूंना नकळत लपवायचं असतं !!!
--- स्वाती ०७.१२.२००८
Tuesday, December 9, 2008
Monday, December 1, 2008
मी आणि ’तो’

आजकाल संध्याकाळच्या रम्य वेळी ......
मी आणि ’तो’ हातात हात घालून फिरतो ,
बराच वेळ एकांतात गुजगोष्टी करतो.
हो ’तोच’ माझा खरा मित्र ......
दुःखाच्या काळात ही साथ देणारा ,
कोणी नसेल की सोबतीला धावून येणारा !
’तोच’ माझा सर्वात जवळचा मित्र .....
मला माझी स्वतःची ओळख करून देणारा ,
एका वेगळ्याच विश्चात घेवून जाणारा !
’तोच’ एक जीवाभावाचा मित्र ......
प्रत्येक गोष्टीवर विचार करायला लावणारा ,
कवितांसाठी शब्द जुळवायला प्रेरित करणारा !
’तोच’ तो माझा खरा मित्र ..........
माझा एकाकीपणा !!!!
--- स्वाती ०१-१२-२००८
हेच जीवन असतं का ???

हेच जीवन असतं का ???
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अपयश झेलायचं ,
तरीही रोज पुन्हा नव्या उमेदीने उठायचं ...
हेच जीवन असतं का ???
सुखाच्या क्षणांना फक्त हाय-बाय करायचं ,
आणि दुःखाशी मात्र घट्ट नातं ठेवायचं ....
हेच जीवन असतं का ???
कोणाकडून अपेक्षा न ठेवता, त्यांच्या अपेक्षांचं भान ठेवायचं
साऱ्या इच्छा मनात ठेवून कुढत कुढत जगायचं ...
हेच जीवन असतं का ???
नको असलेल्या गोष्टींमध्येच समाधान मानायचं
प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी जीव तुटेपर्यंत झगडायचं ...
तुम्हीच सांगा ........
खरंच हेच जीवन असतं का ???
---- स्वाती
Subscribe to:
Posts (Atom)