
हेच जीवन असतं का ???
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अपयश झेलायचं ,
तरीही रोज पुन्हा नव्या उमेदीने उठायचं ...
हेच जीवन असतं का ???
सुखाच्या क्षणांना फक्त हाय-बाय करायचं ,
आणि दुःखाशी मात्र घट्ट नातं ठेवायचं ....
हेच जीवन असतं का ???
कोणाकडून अपेक्षा न ठेवता, त्यांच्या अपेक्षांचं भान ठेवायचं
साऱ्या इच्छा मनात ठेवून कुढत कुढत जगायचं ...
हेच जीवन असतं का ???
नको असलेल्या गोष्टींमध्येच समाधान मानायचं
प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी जीव तुटेपर्यंत झगडायचं ...
तुम्हीच सांगा ........
खरंच हेच जीवन असतं का ???
---- स्वाती
खरंच!! हेच जीवन असतं कां??? अप्रतिम रचना....
ReplyDeleteअशोक कृष्ण,http://kavyavidha.com
तूझी उणीव, 'आठवणी',
ReplyDeleteभरून काढायचा प्रयत्न करतात
मात्र 'आठवणी' मनासारख्या वागतात,
त्यामुले रुसव्या-फुगव्या पासून,
वंचीत झाल्या सारखे वाटते.
तू नसतेस तेव्हा...