
काय जादू असते या पावसात ?
तो येताच नाचू लागते मन हे आनंदात
पाऊस म्हणजे तू .. कधी मला वाटतं
तोही येतो तेव्हा, मन वेडं होऊ लागतं.
आठवतं.. त्याची चातकाप्रमाणे वाट पहाणं,
तो बरसू लागताच, बेधुंद होऊन गाणं.
तोही तुझ्यासारखाच थोडासा खट्याळ..
पहावंसं वाटलं की दडून बसतो ढगांच्या आड.
ऐकतच नाही कधी कधी, खूप खूप सतवतो ..
पण जेव्हा बरसतो, तनमन सुखावून जातो.
तुझ्या आठवणी ही पावसासारख्याच ...
कधी रिमझिम तर कधी मुसळधार .
ये ना आता लवकर, कळत कसं नाही तुला,
कोमेजून गेले आहे मी या विरहाच्या उन्हात.
नको असा त्रास देऊ, जाऊ नकोस दूर दूर ..
माझ्या ह्रुदयी बनून रहा तू प्रीतीचा महापूर !!!
ओलखिच्या माणसाने ओंलखी सारखे वागायाच
ReplyDeleteकारण शोधून बोल्न्यापेक्ष्या
कारना शिवाय बोलावLaughing
मनातले भावः तिला कलले असते
तर शब्द जोलावे लागले नसते
शब्द जोड़ता जोड़ता
जग सोडावे लागले नसते