Thursday, October 23, 2008

पूर्वी कधीच हे झाले नाही ..
जे आता घडले आहे ,

पहिल्याच् भेटीत तुझ्यावर,
मन माझे जडले आहे ...

तुझी स्वप्नं ... तुझे विचार
आता जग माझे हेच !

तुझ्या आठवणींमध्ये,
ना राहिले भान कसलेच !

लाजते आहे आता मी ..
माझंच रूप न्याहाळताना

पाहते आहे कारण आता ..
तुझ्या नजरेतून मी स्वतःला !!!

1 comment:

  1. पाहिले मी तुला
    मज्यासोबत वावरताना
    हळूच माजे दुःख
    तुजा पद्रानी पुसताना

    ReplyDelete