Thursday, October 23, 2008

आठवणींचे दंवबिंदू !!!



पहाटे पहाटे जेव्हा किरणे तुझ्या प्रेमाची,
पसरतात माझ्या ह्रुदयाच्या आकाशात..
तेव्हाच तुझ्या आठवणींचे दंवबिंदू ,
मनाच्या हिरवळीवर चमकू लागतात !

मन अधिकच हळवे होते ,
भरून आलेल्या आभाळासारखे ..
तुला पाह्ताच खुलते मग,
सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे !

जेव्हा पर्वतरांगेवर झुकतात ते काळेभोर नभ,
भासतात जणू प्रेमी मिलन-आतुर..
वाटते असेच एखाद्या बेधुंद क्षणी,
तूही घ्यावेस मला आपल्या मिठीत सामावून !!

3 comments:

  1. माझे नि तुझे नाते असे, की

    तू पडलीस, की मी तुला उचलनारा
    तू रडलीस, की मी तुला हसवणारा

    तू रागावलिस, की मी तुझी समजुत काढणारा
    तू विसरलीस, तरीही तुझी आठवण ठेवणारा

    हेच तर माझे नि तुझे नाते आहे प्रिये

    पाउस तर ४ महीने असतो, पण पहिला पाउस तर विशेष असतो
    तुही माझ्यासाठी विशेष च आहेस . .

    माझे नि तुझे नाते हे असे आहे . .

    ReplyDelete
  2. तू पडलीस, की मी तुला उचलनारा
    तू रडलीस, की मी तुला हसवणारा

    तू रागावलिस, की मी तुझी समजुत काढणारा
    तू विसरलीस, तरीही तुझी आठवण ठेवणारा

    khoop chhan ............

    ReplyDelete
  3. आठवण माझी कधीतरी येईलच तुला

    तु कदाचीत रडशीलही

    हात तुझे जुळवुन ठेव तु

    सगळी आसवं तुझी त्यात सामावतील

    जो थांबला तुझ्या हातावर

    नीट बघ त्याच्याकडे

    एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल..!



    माझ्या आठवणी एखदयाला

    सांगताना तु कदाचीत हसशीलही

    जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता

    नीट वापर त्याला

    अडखळलेला तो शब्द मीच असेल..!



    कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला

    त्याच्या तेजाला तु निखरत राहशील

    मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं

    नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल..!



    कधी जर सुटला बेधुंद गार वारा

    मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील

    मध्येच स्पर्शली तुला

    जर उबदार प्रेमळ झुळुक

    नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल..!

    ReplyDelete